Tuesday, January 8, 2019

EP 03 - एकटा

एकदा जे मिळालं त्याची हाव का वाढू लागते? नेहमी तोच विचार का असतो? मग अनेक प्रश्न मनात का येतात? तिला मी आठवत असेन का? उद्या तिचं लक्ष वेधता येईल असं काय करावं? पण मधेच मन दुहेरी विचार  का करतो? तिला असं काहीच वाटत नसावं. फक्त मी असा विचार करतो. कदाचित तिला मी आठवत पण नसेन. मी तरी का तिला आठवू मग? मी हा असा बारीक आहे. हि पण मला सोडून गेली तर? कोणाला असा हाडकुला माणूस आवडतो? असो. कुणाचा नाद नको. मी एकटाच बारा आहे. कोणी सोडून गेलं की खूप त्रास होतो. एकटं असलेलं बरं. कोणाला उत्तर द्यायला नको. कोणाचं धाक हि नाही. आधी प्रेमात माती खाल्ली आहे. पुन्हा तीच चूक करायला निघालो. पुन्हा त्या विरहाचं ओझं झेपेल का मला? खुप एकटा पडेन मी. भीती वाटते त्या एकट्यापणाची. 'सायाभी साथ न दे' खरंच म्हंटलं आहे कोणीतरी. ते आपलेच कर्म असतात आणि आपल्याला भोगावे लागतात. दुसरं कोणी सोबत येत नाही. एकदा चुकलोय. पुन्हा चुकायचं नाही आहे मला. माझी स्वप्ने पूर्ण होणं जास्त महत्वाची आहेत. माझ्या कुटुंबा नंतर तीच तर माझी आहेत. आपण हिचा नाद सोडावा.
माझ्या मनात जुन्या आठवणींचे वादळ होते. पुन्हा एकटं पडण्याच्या भीतीने डोळ्यात पाणी दाटले होते. मध्य रात्र झाली होती पण झोप येईना. मी कसे बसे डोळे मिटले. अश्रूचं एक थेंब उशीवर झिरपलं.
दुसऱ्या दिवशी मी कामात गुंतलो होतो. एकाग्रचित्तेने काम करत होतो. बऱ्याच गोष्टी अवरायच्या होत्या. Meeting आणि calls ने त्रास दिलेला पण आज संपवावं लागेलच. मी वेळ काढून चहा घ्यायला उठलो. Cup हातात होतं आणि ती चहा घेत समोर उभी होती.
"Hello" ती म्हणाली.
मला तर झटकाच लागला कि! मी पण 'hi' बोलून तिकडून निघालो. आज मी माझ्या मित्राकडे नाही गेलो. मला माहित होतं तिला काही फरक नाही पडणार.
काही दिवस कामात असेच गेले. मी तिच्या भोवती फिरकलो नाही. तिला पण काही जाणवलं नाही. आणि एके दिवशी ती तारिक समझली. पुढच्या training ची तारिक सर्वांना पाठवली गेली होती. अनेक दिवस या तारखेची वाट पाहत होतो आणि ती आज मिळाली. मनात तिचा विचार आला. मी स्वतःला आवरलं आणि तिचा विचार झटकला.
त्याच दिवशी ती पुन्हा चहाला भेटली.
"Hello" ती म्हणाली.
"Hi"
"2nd training ची तारिक आली ना."
"हो. आता त्याची तय्यारी करावी लागेल."
"होना. तुला तर जमत असेल ना. तुला तसं बरंच माहित आहे. मला खूप वाचायला लागणार आहे."
"असं काही नाही. मला पण तितकंच वाचायचं आहे."
"काही काय!!"
"खरंच"
"मला काही doubts आहेत. तुला विचारू का? Will you help me?"
"हो." आता कसं चटकन हो निघालं!! नाही तर शब्द निघत नाही. मी हो तर म्हणालो... पण तय्यारी  तर मला ही करावी लागेल ना.
त्या दिवसा नंतर मी तिला काही बोललो नाही. ती किमान दोनदा तरी विचारून गेली. मला वेळ देताच येत नव्हतं. नंतर तिने विचारणं हि बंद केलं. हि विसरली कि काय असं वाटू लागलं. म्हणून मी बळच जाऊन तिला आठवण करून दिली.
"नाही. पुन्हा कधी तरी बसू. आज नको."
"का? आज माझ्याकडे वेळ आहे."
"घरी जायचं आहे."
"उशिरा जाशील एक दिवस."
"Thank you पण आज नको."
"Ok" मी माझी bestवाली smile दिली. आत मला वाईट वाटलं. थोडंच. पण वाटलं. दोन दिवसाने मज्जेत मी पुन्हा तिला थांबवायचं प्रयत्न केलं.
"मोठे लोक! वेळेत जातात आणि वेळेत येतात."
ती हसली आणि माझ्याकडे पाहून काही नाही म्हणाली.
"आज पण वेळेत घरी जायचं असेल ना."
ती पुन्हा हसली, "हो. वेळेत तर जायचं आहे."
इतक्यात तिकडे माझा मित्र आला आणि त्यानं तिला विचारलं, "चल, आपण निघायचं का आता?" मी तर थक्क झालो. हा आणि हि! कसं शक्य आहे! तो माझ्या समोर तिला घेऊन गेला आणि मी तिकडेच उभा राहिलो.

Saturday, January 5, 2019

EP 02 - Happy Women's Day

ती दारातून आत आली. उशिरा येण्या बद्धल तिनं छान smile करून trainer ला 'sorry for being late' असं म्हणाली. दुरून तिच्या ओठांना पाहून असंच काही म्हणाली असेल याचा अंदाज बांधला. तिनं hall मध्ये पाहिलं. रिकामी खुर्ची शोधत होती. ती माझ्याकडे पाहत होती आणि माझ्या दिशेला चालू लागली. मी लगेच एक खुर्ची ओढली तिच्यासाठी. आई शपथ!!! माझं हृदय कंठात आलं होतं. घसा सुखला होता. AC मध्ये घाम फुटेल अशी अवस्था झाली होती. पण ती अलीकडची खुर्ची ओढून दुसऱ्या table वर बसली. अचानक मनावरचं दडपण कमी झाल्याचं जाणवलं. वाईट वाटलं की ती लांब बसली होती. इतक्यात तिनं वळून पाहिलं. माझ्याकडे पाहून smile केलं. फक्त माझ्या करिता smile केलं. मी तर अक्षर्ष लाजलो. कुणी तरी पाहिल अशी शंखा वाटली. ती पुढे पाहत होती. पुढची training तिला पाहत बसलो होतो.
आज हिच्याशी बोललेच पाहिजे. एकदा ओळख झाली पाहिजे.
तितक्यात "Ice breaking session!" अशी घोषणा  झाली. 5 मिनिटात आम्हाला जास्तीत जास्त लोकांशी ओळख करून घ्यायची होती. मी सरळ तिच्याकडे निघालो. कोणीतरी तिच्यासोबत बोलत होतं. मी हि कोणा सोबत बोलत होतो. तिला सतत कोणी तरी गाठत होतं.
"Last 2 minutes"
मी लगेच जाऊन तिच्या समोर उभा राहिलो. पण ती आधीच दुसऱ्या व्यक्ती सोबत बोलत होती. नेहमीसारखं तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. वेळ संपली आणि ती माझ्याकडे वळली. आता आपल्या जागेवर जायचं होतं. बोलणं काही झालं नाही. Training नंतर आमचं group photo झालं. तेव्हढंच आनंद. एक तरी फोटो सोबत असणार. Training चा दुसरा भाग पण आहे हे कळलं. तारीख सांगितली नाही. तिनं माझ्याकडे पाहून smile केलं याचं समाधान तर होतं.
रोजचे दिवस ढकलत होतो. तिला पाहायचे बहाणे शोधाचे. रोज त्या मित्राकडे 'जेवायला चाल' म्हणायला पोहचायचो. ती नेहमी कामात असे.
एका सकाळी सगळ्या मुलींच्या table वर गुलाब ठेवत होते. तो Women's day होता.
सकाळी मीच एक गुलाब ठेवला असता तर कुणालाच कळलं नसतं. तिला हि कळलं नसतं.
सगळ्या मुली गुलाबी रंगाचे कपडे घालून आल्या होत्या. आज सगळ्या मुलींना wish करू शकत होतो. आजची संधी चालून आलेय. मी तातडीनं उठलो आणि सर्व मुलींना wish करू लागलो. तिच्या दिशेने जितक्या मुली होत्या त्यांना 'Happy Women's Day' असं म्हणून हात मिळवत होतो.
शेवटी तिच्या table जवळ पोहोचलो. अजून 2 जणी. मग तिलाच wish करणार. अजून एक. आता तीच. छातीत धडधड वाढली होती. इतक्यांदा तीच ओळ म्हणालो होतो पण आता बोबडी वळली होती. घशाला कोरड पडली होती. तिच्या समोर गेलो. ती उभी राहिली. माझा हात मी पुढे केला. तिनं हि तिचा हात माझ्या हातात दिला. मला काही सुचेना. मी गिळून घास ओला केला. तिचा हात माझ्या हातात अवशकतेहून जास्त वेळ होता. मी बोलण्या आधी तीच म्हणाली, "Thank you!"
मग हाडबडून मी हळूच म्हणालो, "Happy Women's Day!" माझा घाबरघुबर चेहरा तिला दिसलाच असेल. ती हसली आणि जागेवर बसली.
आपण hero बनायला जातो तेव्हाच आपली गोची कशी होती! एरवी सर्वांशी इतकं छान बोलतो मी, हिच्या समोरच का माझं बाळू होतं. हे नाही चालणार. अजून किती वेळ लागणार तिच्याशी बोलायला...
Women's day माझ्या करीत तरी happy ठरलं. मी आहे, हे तिला दिसलं. पुढे नशीब माझं.
लवकरच पुढच्या training ला भेटलं पाहिजे. तारीख पण नाही माहित अजून.
----परिणिता (06 Jan 2019)

EP 01 - तिला पाहतो मी

रोजचा दिवस होता. काम होता आणि त्यात audit चालू होतं. सकाळ पासून auditor सोबत बसून तिला काय हवं नको ते बघत होतो.
"Please check this GL"
हो... सर्वच बघेन पण आता जा आणि मला माझं काम आवरूदे. मनात असं चालू होतं पण तिला बोलताना मात्र..."yes. Sure. Ok." हेच बोलत होतो.
"How do you value inventories?"
"We have inventories classified into categories like, finished, semi finished, raw material and packing material..."
"Hi...!!"  अचानक ती hi का म्हणाली म्हणून मी तिच्या कडे पाहिलं. तर तिचं लक्ष माझ्याकडे नसून भोवतीच्या सर्वांकडे होतं. तीच्या बाजूला एक मुलगी येऊन उभी होती आणि यांच्या गप्पा सुरु झाल्या होत्या.
"Hello!! How come you are here?"
"I am doing audit."
मी त्यांच्या गप्पा पाहत होतो. मुली बोलू लागल्या कि त्यांचे हाव भाव पाहावेत. बोलण्यात तर काही महत्वाचं नसतं. मला तर ती विसरूनच गेली. त्यांच्या गप्पा छान रंगल्या होत्या. काही classes आणि lectures बद्धल बोलणं चालू होतं.
"Please don't find too many points for his country..." असं म्हणत दुसरी मुलगी माझ्याकडे पाहून smile करत उभी होती. मग ती auditor पण माझ्याकडे पाहू लागली आणि हसली. आता मला ही हसणं भाग होतं. मी छान smile दिली.
आली मोठी शहाणी! काय समझते हि स्वतःला. Point कडू नको म्हणतेय. कोण एवढी लागून गेली आहे ही? Auditor ला सांगण्या इतकी मोठी झाली! काल तर आली हि office ला आणि आज auditor शी मैत्री!! हं!!!
"I was saying..." मी पुन्हा तिला सांगू लागलो.
निधान तास भर हेच प्रश्न आणि उत्तरे चालू होती.
"Hey!!" हिचं लक्ष परत कुठे तरी गेलं म्हणून मी वर पाहिलं तर पुन्हा तीच उभी होती.
"Hi" या वेळी तिनं आधी माझ्याकडे पाहिलं. मी तिच्या कडे पहिल्यांदा पाहिलं. इतकी काही वाईट नाही दिसत. हसते हि छान. English पण छान बोलते. पण आगाऊ वाटते. तितक्यात तिने नजर फिरवली. मी काही बोलतो इतक्यात तिचं लक्ष auditor कडे होतं.
"See you around then..." असं म्हणत ती गेली.
हं!! आगाऊ!!
इतक्यात Meeting मध्ये मला बोलावलं. सगळं बसले होते आणि साहेबांचं बोलणं सुरु झालं. मी माझ्या team मधल्या मित्रा कडे पाहिलं आणि ऐकत होतो.
"What do you think?" असं म्हणत तो आमच्या कडे पाहू लागला.
"I think one must check the production."
त्याने मान डोलावली पण काही convince झाला नाही.
"Not completely correct." त्याने नजर माझ्या मित्राकडे फिरवली.
"Number of peices shall be considered."
"There are 2 products. One has increased and other decreased. How will you check?"
सगळे शांत होते. मी नजर फिरवली. सर्वांचे चेहरे blank होते. मला ही उत्तर हवं होतं इतक्या ती म्हणाली, "it depends on the tonnage of production and not number of pieces or level of production."
"CORRECT!"
त्याचं correct ऐकताच सगळ्या नजरा तिच्याकडे वळल्या. फक्त आगाऊ नाही तर डोकं पण आहे तिच्याकडे. उरल्या वेळात मी तिचं आणि साहेबांचं सौवाद ऐकत होतो. पहिल्यांदा तिला पाहत होतो आणि मग सतत तीच समोर येत होती. या न त्या कारणाने तीच दिसत हाती.
तिलाच पाहत होतो...
एकदा कोणी नजरेत भरलं कि सतत त्याचाच विचार आपण का करतो? ती सहज बोलून गेली पण माझ्या विचारात permenantly बसली. जसं श्वास चालू असतो तशीच माझी नजर तिच्या शोधात असू लागली. केव्हा पासून ते मलाही कळलं नाही.
स्वतःच्या जागेवरून उठून सारखं तिच्या दिशेला पाहू लागलो होतो. दिवस भर ती कामात असत. पुन्हा बोलायला मिळेल अशी संधी सापडत नव्हती. अशी संधी घडवून आणावी लागेल. तिचं circle माझ्या circle हुन वेगळं होतं. Common link शोधली पाहिजे.
मी रोज तिला observe करत होतो. तिच्या येण्याची, चहाची, जेवणाची आणि जाण्याची वेळ ठराविक होती. बोलताना हि ती मोजक्या माणसांशी बोलायची. तिच्या भोवती बसलेल्या व्यति सोबत मैत्री होती. निदान तिला जवळून पाहता येईल. त्या मित्राकडे जाण्याची खटपट सुरु झाली. रोज काही कारण काढून त्याला भेटायचो. तिला जरा जवळून पाहायला मिळू लागलं म्हणून आनंद होतं. पण मी आल्याने तिला काही फरक पडत नव्हतं. तिनं कधी माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. मी मोठ्याने बोलून पण पाहिलं पण तिचं लक्ष नव्हतं. तिच्या मागे पण जाऊन पाहिलं पण ती कधी ओळख पण दाखवत नव्हती.
काही दिवस प्रयत्न सुरु होते. एक दिवस ती auditor पुन्हा काही प्रश्न घेऊन आली. मनात सारखा वाटत होतं तिनं  अचानक यावं. या वेळी माझी बोलण्याची पूर्ण तय्यारी झाली होती. ती दिसली हि नाही आणि अली पण नाही. जमलं तितकं auditor ला अडवलं पण ती आलीच नाही. ती दिसत पण नव्हती. अर्धा दिवस झाला होता.
"काय रे, काय करतोयस?" मी त्या मित्राकडे तिला शोधात पोचलो होतो.
"आज काही नाही रे. इतकं हे पाठवलं कि आजचं काम संपलं."
मी त्याच्याशी बोलत होतो पण नजर तिच्या जागेकडे होती.
"ती आज आली नाही आहे." मित्र काम करत मला म्हणाला. माझं काम झालं होतं.
"कोण?" मी निरागसपणे विचारलं.
"जिला तू शोधतोयस. ती."
"मी तर तुला भेटायला आलो."
"कोणाला बनवतोयस? मला कि स्वतःला?"
मी हसलो, "जेवायला चल...." आणि मी तिकडे थांबलो नाही.
पुढचे दोन दिवस ती दिसली नाही. मी कामात बुडून गेलो होतो. तिचा विचार पण सोडला मी. तिसऱ्या दिवशी full day training होती म्हणून एकदा तिला पाहायचं होता. पण ती आज पण आली नाही. Training मध्ये मी शेवटच्या table वर बसलो. Trainingकडे लक्ष हि नव्हतं. सगळे आपापल्या जागेवर बसत होते. माझ्यासोबत बसलेल्या व्यक्तिंची ओळख करून घेत होतो आणि इतक्यात ती आत आली.
----परिणिता (06 Jan 2019)

EP 03 - एकटा

एकदा जे मिळालं त्याची हाव का वाढू लागते? नेहमी तोच विचार का असतो? मग अनेक प्रश्न मनात का येतात? तिला मी आठवत असेन का? उद्या तिचं लक्ष वेधत...