रोजचा दिवस होता. काम होता आणि त्यात audit चालू होतं. सकाळ पासून auditor सोबत बसून तिला काय हवं नको ते बघत होतो.
"Please check this GL"
हो... सर्वच बघेन पण आता जा आणि मला माझं काम आवरूदे. मनात असं चालू होतं पण तिला बोलताना मात्र..."yes. Sure. Ok." हेच बोलत होतो.
"How do you value inventories?"
"We have inventories classified into categories like, finished, semi finished, raw material and packing material..."
"Hi...!!" अचानक ती hi का म्हणाली म्हणून मी तिच्या कडे पाहिलं. तर तिचं लक्ष माझ्याकडे नसून भोवतीच्या सर्वांकडे होतं. तीच्या बाजूला एक मुलगी येऊन उभी होती आणि यांच्या गप्पा सुरु झाल्या होत्या.
"Hi...!!" अचानक ती hi का म्हणाली म्हणून मी तिच्या कडे पाहिलं. तर तिचं लक्ष माझ्याकडे नसून भोवतीच्या सर्वांकडे होतं. तीच्या बाजूला एक मुलगी येऊन उभी होती आणि यांच्या गप्पा सुरु झाल्या होत्या.
"Hello!! How come you are here?"
"I am doing audit."
मी त्यांच्या गप्पा पाहत होतो. मुली बोलू लागल्या कि त्यांचे हाव भाव पाहावेत. बोलण्यात तर काही महत्वाचं नसतं. मला तर ती विसरूनच गेली. त्यांच्या गप्पा छान रंगल्या होत्या. काही classes आणि lectures बद्धल बोलणं चालू होतं.
"Please don't find too many points for his country..." असं म्हणत दुसरी मुलगी माझ्याकडे पाहून smile करत उभी होती. मग ती auditor पण माझ्याकडे पाहू लागली आणि हसली. आता मला ही हसणं भाग होतं. मी छान smile दिली.
आली मोठी शहाणी! काय समझते हि स्वतःला. Point कडू नको म्हणतेय. कोण एवढी लागून गेली आहे ही? Auditor ला सांगण्या इतकी मोठी झाली! काल तर आली हि office ला आणि आज auditor शी मैत्री!! हं!!!
"I was saying..." मी पुन्हा तिला सांगू लागलो.
निधान तास भर हेच प्रश्न आणि उत्तरे चालू होती.
निधान तास भर हेच प्रश्न आणि उत्तरे चालू होती.
"Hey!!" हिचं लक्ष परत कुठे तरी गेलं म्हणून मी वर पाहिलं तर पुन्हा तीच उभी होती.
"Hi" या वेळी तिनं आधी माझ्याकडे पाहिलं. मी तिच्या कडे पहिल्यांदा पाहिलं. इतकी काही वाईट नाही दिसत. हसते हि छान. English पण छान बोलते. पण आगाऊ वाटते. तितक्यात तिने नजर फिरवली. मी काही बोलतो इतक्यात तिचं लक्ष auditor कडे होतं.
"See you around then..." असं म्हणत ती गेली.
हं!! आगाऊ!!
इतक्यात Meeting मध्ये मला बोलावलं. सगळं बसले होते आणि साहेबांचं बोलणं सुरु झालं. मी माझ्या team मधल्या मित्रा कडे पाहिलं आणि ऐकत होतो.
"What do you think?" असं म्हणत तो आमच्या कडे पाहू लागला.
"I think one must check the production."
त्याने मान डोलावली पण काही convince झाला नाही.
त्याने मान डोलावली पण काही convince झाला नाही.
"Not completely correct." त्याने नजर माझ्या मित्राकडे फिरवली.
"Number of peices shall be considered."
"There are 2 products. One has increased and other decreased. How will you check?"
सगळे शांत होते. मी नजर फिरवली. सर्वांचे चेहरे blank होते. मला ही उत्तर हवं होतं इतक्या ती म्हणाली, "it depends on the tonnage of production and not number of pieces or level of production."
"CORRECT!"
त्याचं correct ऐकताच सगळ्या नजरा तिच्याकडे वळल्या. फक्त आगाऊ नाही तर डोकं पण आहे तिच्याकडे. उरल्या वेळात मी तिचं आणि साहेबांचं सौवाद ऐकत होतो. पहिल्यांदा तिला पाहत होतो आणि मग सतत तीच समोर येत होती. या न त्या कारणाने तीच दिसत हाती.
तिलाच पाहत होतो...
एकदा कोणी नजरेत भरलं कि सतत त्याचाच विचार आपण का करतो? ती सहज बोलून गेली पण माझ्या विचारात permenantly बसली. जसं श्वास चालू असतो तशीच माझी नजर तिच्या शोधात असू लागली. केव्हा पासून ते मलाही कळलं नाही.
स्वतःच्या जागेवरून उठून सारखं तिच्या दिशेला पाहू लागलो होतो. दिवस भर ती कामात असत. पुन्हा बोलायला मिळेल अशी संधी सापडत नव्हती. अशी संधी घडवून आणावी लागेल. तिचं circle माझ्या circle हुन वेगळं होतं. Common link शोधली पाहिजे.
मी रोज तिला observe करत होतो. तिच्या येण्याची, चहाची, जेवणाची आणि जाण्याची वेळ ठराविक होती. बोलताना हि ती मोजक्या माणसांशी बोलायची. तिच्या भोवती बसलेल्या व्यति सोबत मैत्री होती. निदान तिला जवळून पाहता येईल. त्या मित्राकडे जाण्याची खटपट सुरु झाली. रोज काही कारण काढून त्याला भेटायचो. तिला जरा जवळून पाहायला मिळू लागलं म्हणून आनंद होतं. पण मी आल्याने तिला काही फरक पडत नव्हतं. तिनं कधी माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. मी मोठ्याने बोलून पण पाहिलं पण तिचं लक्ष नव्हतं. तिच्या मागे पण जाऊन पाहिलं पण ती कधी ओळख पण दाखवत नव्हती.
काही दिवस प्रयत्न सुरु होते. एक दिवस ती auditor पुन्हा काही प्रश्न घेऊन आली. मनात सारखा वाटत होतं तिनं अचानक यावं. या वेळी माझी बोलण्याची पूर्ण तय्यारी झाली होती. ती दिसली हि नाही आणि अली पण नाही. जमलं तितकं auditor ला अडवलं पण ती आलीच नाही. ती दिसत पण नव्हती. अर्धा दिवस झाला होता.
"काय रे, काय करतोयस?" मी त्या मित्राकडे तिला शोधात पोचलो होतो.
"आज काही नाही रे. इतकं हे पाठवलं कि आजचं काम संपलं."
मी त्याच्याशी बोलत होतो पण नजर तिच्या जागेकडे होती.
"ती आज आली नाही आहे." मित्र काम करत मला म्हणाला. माझं काम झालं होतं.
"कोण?" मी निरागसपणे विचारलं.
"जिला तू शोधतोयस. ती."
"मी तर तुला भेटायला आलो."
"कोणाला बनवतोयस? मला कि स्वतःला?"
मी हसलो, "जेवायला चल...." आणि मी तिकडे थांबलो नाही.
"आज काही नाही रे. इतकं हे पाठवलं कि आजचं काम संपलं."
मी त्याच्याशी बोलत होतो पण नजर तिच्या जागेकडे होती.
"ती आज आली नाही आहे." मित्र काम करत मला म्हणाला. माझं काम झालं होतं.
"कोण?" मी निरागसपणे विचारलं.
"जिला तू शोधतोयस. ती."
"मी तर तुला भेटायला आलो."
"कोणाला बनवतोयस? मला कि स्वतःला?"
मी हसलो, "जेवायला चल...." आणि मी तिकडे थांबलो नाही.
पुढचे दोन दिवस ती दिसली नाही. मी कामात बुडून गेलो होतो. तिचा विचार पण सोडला मी. तिसऱ्या दिवशी full day training होती म्हणून एकदा तिला पाहायचं होता. पण ती आज पण आली नाही. Training मध्ये मी शेवटच्या table वर बसलो. Trainingकडे लक्ष हि नव्हतं. सगळे आपापल्या जागेवर बसत होते. माझ्यासोबत बसलेल्या व्यक्तिंची ओळख करून घेत होतो आणि इतक्यात ती आत आली.
----परिणिता (06 Jan 2019)
No comments:
Post a Comment